त्वरा करा; UPSC साठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपत आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. ३ मार्च २०२० रोजी अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. भारतीय प्रशासकीय आणि अन्य सेवेतील ७९६ पदांसाठी ही भरती होत आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in वर जाऊन या परीक्षेसाठी नोंदणी करता येईल. परीक्षा ३१ मे २०२० रोजी होणार आहे. कोण करू शकतं अर्ज? केवळ पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात यूपीएससीची प्रक्रिया पार पडते. मुख्य परीक्षा १,७५० गुणांची असते तर मुलाखतीसाठी २७५ गुण असतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातात. परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), रेल्वे गट ए, भारतीय टपाल सेवा, इंडियन ट्रेड सर्व्हिसेस सह अन्य सेवांसाठी नोकरभरती केली जाते. असा करा अर्ज - १) UPSC च्या संकेतस्थळावर upsconline.nic.in येथे जा. २) ONLINE APPLICATION FOR VARIOUS EXAMINATIONS OF UPSC या लिंकवर क्लिक करा. ३) Click Here for PART I असे लिहिले असेल तेथे क्लिक करा. ४) सर्व सूचना काळजीपूर्व वाचून नंतर YES वर क्लिक करा. ५) नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचं नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आदि सर्व विचारलेली माहिती भरा आणि सबमीट करा. ६) शुल्क ऑनलाइन भरा. ७) परीक्षा केंद्र निवडा. ८) फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्राची कॉपी अपलोड करा. ९) भाग १ अॅक्सेप्ट झाल्यानंतर भाग २ साठी नोंदणी करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ah5YFh
via IFTTT

Post a Comment

0 Comments