Also visit www.atgnews.com
JEE Main April 2020 अर्ज भरण्यास अखेरचे दोन दिवस
नवी दिल्ली: देशभरातील एनआयटी, आयआयटी आणि राज्य सरकारी अनुदानित संस्थांमधील (अभियांत्रिकी) पदवी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम JEE Main परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत. ६ मार्च रोजी या प्रक्रियेची मुदत संपते आहे. इंजिनीअरींगसाठी इच्छुक विद्यार्थी jeemain.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपले अर्ज भरू शकतात. चे अॅडमिट कार्ड १६ मार्च २०२० पासून मिळणार आहेत. २०२० परीक्षा ५, ७, ८,९ आणि ११ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर होणार आहे. JEE Main April 2020 साठी नोंदणी कशी करायची? इच्छुक उमेदवारांनी पुढीलप्रमाणे नोंदणी करावी- १) jeemain.nta.nic.in ही परीक्षेची अधिकृत वेबसाईट ओपन करावी २) होमपेजवरील JEE Main April 2020 रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. ३) नाव, पालकांचे नाव, पत्ता, इमेल आयडी, फोन नंबर, शैक्षणिक पात्रता, परीक्षा केंद्र आणि अन्य माहिती भरा. ४) तुमच्या स्वाक्षरीची आणि छायाचित्राची स्कॅन्ड कॉपी अपलोड करा. ५) ऑनलाइन अॅप्लिकेशन फी भरा आणि रेफरन्स क्रमांक नोंदवून ठेवा. ६) एक पुन्हा तुमचा JEE Main April 2020 अर्ज नीट तपासून पाहा आणि सबमीट करा. ७) अर्जाचं प्रिंट आऊट काढून तुमच्या माहितीसाठी तुमच्याजवळ ठेवून घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38pQnlo
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments