कोव्हिड-१९ वर बेनेट विद्यापीठाची जागतिक परिषद

नवी दिल्ली: बेनेट विद्यापीठाचा भाग असलेल्या टाइम्स स्कूल ऑफ मीडियाने एकदिवसीय ऑनलाइन परिषदेचं आयोजन केलं आहे. ९ एप्रिलला होणाऱ्या या परिषदेत मीडिया, औषधे, सार्वजनिक धोरण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. शी लढताना या मान्यवरांना आलेले अनुभव ते मांडणार आहेत. एखाद्या भारतीय विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी ही पहिली आहे. 'कोव्हिड-१९ वर जागतिक ऑनलाइन परिषद: दुष्परिणाम आणि भविष्य' ही या जागतिक परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. कोव्हिड-१९ महामारीशी लढा देतानाचे आरोग्य तसेच आर्थिक क्षेत्रातील भारतीय व जागतिक तज्ज्ञांचे अनुभव, विचार एका व्यासपीठावर मांडले जावेत हा या परिषदेमागील उद्देश आहे. नोंदणी करण्यासाठी ही परिषद ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ९.३० या वेळेत (IST) होणार आहे. या परिषदेत एकूण सहा सत्र असतील. हे सहा सत्र तीन विविध संकल्पनांवर आधारलेले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. तसेच ते पहिल्या सत्रालाही संबोधित करणार आहेत. १) संकल्पना १ : आर्थिक दुष्परिणाम आणि त्यातून पुढे आलेले मार्ग (सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता) : सहभाग - भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी कार्यकारी संचालक डॉ. अरविंद विरमणी, माजी केंद्रीय अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या माजी सदस्य प्रा. शमिका रवी. २) संकल्पना २: करोना महामारीशी लढताना इतर देशांचे अनुभव आणि त्यातून मिळणारे धडे (सायंकाळी ५.४० ते ६.४० वाजता) : सहभाग - ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इंडिया-चायना स्टडीजचे संचालक आणि माजी सरकारी वकील प्रा. वेनजुआन झँग, इटलीच्या बोलोग्ना विद्यापीठाचे डॉ. बिट्राइस गलेली यांचे अनुक्रमे चीन आणि इटलीतील करोनाच्या परिस्थितीचे अनुभव. सत्र २ (रात्री ८ ते ९): अमेरिकेतील अनुभवांवर बोलतील हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मेडिसीन विभागाचे प्राध्यापक आणि हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. आशिष कुमार झा. तसेच आयुष्मान भारतचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, केरळचे माजी आरोग्य सचिव आणि सध्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. दिनेश अरोरा आणि नारायण हॉस्पिटलच्या अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी. ३) संकल्पना ३ : अफवा आणि कट याविरोधातील लढाई (सायंकाळी ६.५० ते ७.५०) : सहभाग - बर्लिनचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन तज्ज्ञ ओगन स्वीने, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमचे संचालक प्रा. रास्मस क्लेइस नेल्सन, अल्ट न्यूज सायन्सच्या एडिटर आणि स्वीडनच्या न्यूरोसायंटिस्ट डॉ. सौम्या शेख आणि APAC सिंगापूरच्या गुगल न्यूज लॅब लीडच्या इर्नी जे लिऊ. निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार समारोपाचे भाषण करतील. भारतातील विविध शहरातून पत्रकार, अभ्यासक, मीडियाचे विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b7azuk
via IFTTT

Post a Comment

0 Comments