Also visit www.atgnews.com
वर्क फ्रॉम होम लॉकडाऊननंतरही राहील?
कोव्हिड - १९ च्या फैलावामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय घ्यावा लागला. हे वर्क फ्रॉम होमचं कल्चर भारतात या लॉकडाऊनच्या निमित्ताने रुजलं. कदाचित लॉकडाऊननंतरदेखील सुरू राहू शकतं. वर्क फ्रॉम कडे मोठ्या प्रमाणावर एक ट्रायल रन म्हणजेच सध्या एक प्रयोग म्हणून पाहता येईल, असं मोठ्या कंपन्यांचे HR हेड सांगत आहेत. कंपन्या तसेच कर्मचारी दोहोंच्याही फायद्याचे आहे, असे ही मंडळी सांगत आहेत. कसं ते पाहू... कर्मचाऱ्यांचा घरून काम करण्यामागचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाचा वेळ वाचतो आणि वर्क-लाइफ-बॅलन्सच्या बाबतीत खूपच लवचिकता साधता येते. कंपन्यांसाठी फायदा असा की कर्मचारी घरी असल्याने कंपनी चालवण्याचा एक मोठा खर्च (एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट) वाचतो आणि उत्पादकताही वाढते. अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, RPG समूह, वेदांता, EY, Cognizant, टायटन, डेलॉइट, व्हर्लपूल, पेटीएम आदी प्रमुख कंपन्यांच्या एचआर हेड्सच्या मते व्हर्च्युअल वर्कप्लेसेस हेच कामाच्या पद्धतीचं भविष्य आहे. अॅक्सिस बँकेचे एचआर प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष राजकमल वेम्पती म्हणतात, 'वर्क फ्रॉम होम पद्धत टिकून राहील. किमान २०-३० टक्के कर्मचारी तर WFH करू शकतील.' बँक ऑफ बडोदाचे स्ट्रटेजिक एचआर हेड जॉयदीप दत्त रॉय यांच्या मते वर्क फ्रॉम होम ही इझ ऑफ डुइंग बिझनेसची गरज आहे. यामुळे कॉस्ट कटिंगही होते. कॉग्निझंट इंडियाचे अध्यक्ष रामकुमार राममूर्ती म्हणतात, 'WFH ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात आहे. इतर देशांमध्ये तर ती यापूर्वीच रुजली आहे.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X5j6dl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments