Also visit www.atgnews.com
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर मोफत ऑनलाइन कोर्स
बेंगळुरू: नॅसकॉमने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर एक उपलब्ध करून दिला आहे. तरुणांना या कोर्सचा लाभ उठवत स्वत:चे स्कील्स अपग्रेड करण्याची संधी आहे. हा कोर्स १५ मेपर्यंत सर्वांसाठी मोफत आहे. ने आज मंगळवारी हा कोर्स लाँच केला आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यामाने नॅसकॉमने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. तरुणांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान अवगत करून देणे हे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नॅसकॉम फ्युचरस्कील्स हे आयटी इंडस्ट्रीचे ऑनलाइन लर्निंगचे व्यासपीठ आहे. नॅसकॉम फ्युचरस्कील्सच्या माध्यमातून हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. फाउंडेशनल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कोर्स असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. एरव्ही या कोर्सचे शुल्क ६,८०० रुपये आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतर १५ मेपर्यंत हा कोर्स सर्वांसाठी मोफत उपलब्ध राहील, असे नॅसकॉमने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साव्हने म्हणाले, 'Covid-19 ने जगासमोर आणि उद्योगांसमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. आपण एक देश म्हणून एकत्रितपणे या आव्हानांचा सामना करत असताना, आपले स्कील्स अद्ययावत करणए अत्यावश्यक आहे. म्हणूनच तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि उद्योगांच्या भविष्यातील गरजांशी जोडून घ्यावे. हा अभ्यासक्रम आयटी प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी आहे. (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्याची जाण प्रत्येकाला असणं ही काळाची गरज आहे.' नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष म्हणाले, 'लॉकडाऊनच्या सध्याच्या स्थितीत इंडस्ट्रीपुढे जी आव्हाने आहेत, ज्याप्रकारे कामाचे स्वरुप बदलले आहे, ते पाहता AI सारखी इमर्जिंग टेक्नॉलॉजी आपल्याला अवगत असायला हवी. लॉकडाऊनच्या या वेळाचा लाभ घ्या आणि तुमचे स्कील्स अद्ययावत करा.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2yIGYcD
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments