Also visit www.atgnews.com
जॉब ऑफर्सबद्दल केंद्र सरकारचं कंपन्यांना आवाहन
करोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगातले बहुतांश देश स्थितीत आहेत. भारतातही २१ दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम जर कुठल्या क्षेत्रावर झाला असेल तर तो नोकऱ्यांच्या. हातावर पोट असणाऱ्या कोट्यवधी मजुरांच्या तोंडचा घास करोना आणि त्यानंतरच्या स्थितीने पळवला आहे. दुसरीकडे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या मनातही ही भीती सातत्याने आहे की त्यांची नोकरी तर जाणार नाही ना. याव्यतिरिक्त ज्यांची पदवी आता कुठे पूर्ण होत आहे, त्या तरुणांना कॅम्पस प्लेसमेंटची प्रतीक्षा आहे. या दरम्यान केंद्र सरकारचं या सगळ्यावर एक महत्त्वाचं वक्तव्य आलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सार्वजनिक स्तरावर कंपन्यांना आवाहन केले आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या ऑफर्स परत घेऊ नयेत. ज्या कंपन्या तंत्र शिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट घेतात त्यांना उद्देशून विशेषत: हे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केलं आहे. पोखरियाल यांचं हे वक्तव्य आयआयटी दिल्लीच्या संचालकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केल्यानंतर आलं आहे. आयआयटी दिल्लीचे संचालक रामगोपाल राव म्हणाले की सर्व आयआयटी 'वन कँडिडेट वन जॉब' या नियमाचं पालन करतात. त्यामुळे अशा वेळी जर कंपन्यांनी ऑफर केलेला मागे घेतला तर त्या विद्यार्थ्याला दुसरी कोणतीही कंपनी ऑफर देत नाही. 'ही समस्या अस्थायी आहे. सरकार देशाला यातून बाहेर काढण्याचे सर्वतोपरि प्रयत्न करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली आहे, ते देशाचे कुशाग्र मेंदू आहेत. ते कंपन्यांना या समस्येतून बाहेर काढण्यातही मदत करतील,' असं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले. मागील आठवड्यात आयआयटींसोबत एक बैठकीत पोखरियाल यांनी सर्व आयआयटीच्या संचालकांना सांगितले होते की त्यांनी स्पेशल प्लेसमेंट ड्राइव्ह स्थगित करावा. ही मोहीम त्या विद्यार्थ्यांसाठी चालणार होती, ज्यांच्या जॉब ऑफर रद्द झाल्या आहेत. आयआययी दिल्ली आणि आयआयटी कानपूरने हा प्लेसमेंट ड्राइव्ह जुलै आणि ऑगस्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UQaIwI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments