हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हार्वर्ड विद्यापीठाने विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. तब्बल ६४ अभ्यासक्रम विद्यापीठाने सर्वांसाठी खुले केले आहेत. हे अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम ११ विविध विषयांमधील आहेत. हे अभ्यासक्रम विनामूल्य व प्रमाणित आहेत. आर्ट अँड डिझाइन, व्यवसाय, संगणक विज्ञान, डेटा सायन्स, शिक्षण आणि अध्यापन, आरोग्य आणि औषध, ह्युमॅनिटीज, गणित, प्रोग्रामिंग सायन्स आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये विनामूल्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठाकडून ऑनलाईन अभ्यासक्रम करावयाचे आहेत, त्यांनी हार्वर्डचे ऑनलाईन लर्निंग पोर्टल online-learning.harvard.edu वर जाऊन लॉगइन करावयाचे आहे. कोर्सचा कालावधी, दररोज शिकण्याचा अवधी, विषय, भाषा, काठिण्य पातळी, विषयनिहाय तपशील आदी सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हार्वर्डच्या मोफत अभ्यासक्रमासाठी कशी करायची नोंदणी? १) हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं पोर्टल online-learning.harvard.edu वर जा,. २) यादीतून आपल्या आवडीचा विषय विभाग निवडा. ३) यानंतर तुम्ही एका नव्या पानावर जाल. ४) आता यादीमधून तुमच्या आवडीचा विषय निवडा. ५) अभ्यासक्रमाचा कालावधी, दररोजची वेळ, अभ्यासक्रमाची भाषा आणि अन्य तपशीच चेक करा. ६) त्यानंतर एन्रोलवर क्लिक करा आणि आणि अॅडमिशन प्रक्रिया पूर्ण करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3enwik4
via IFTTT

Post a Comment

0 Comments