सीबीएसईचे मुलांसाठी ऑनलाइन फिटनेस वर्ग

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई मुलांसाठी नवे ऑनलाइन क्लासेस सुरू करणार आहे. हे वर्ग असतील फिटनेसचे धडे देणारे ऑनलाइन वर्ग. सीबीएसई आणि फिट इंडिया मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. यात विद्यार्थ्यांना पोषण आहार, योगा आणि बेसिक व्यायाम शिकवले जातील. केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निसंक यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. हे फिटनेस वर्ग १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह फिटनेस सेशन्स आयोजित केले जातील. हे ऑनलाइन वर्ग सकाळी ९.१५ वाजल्यापासू सुरू होणार आहेत. या वर्गांचं मुख्य उद्दिष्ट ऑनलाइन वर्गांद्वारे विद्यार्थ्यांना पूर्णपणे फिट ठेवणे हा आहे. १ महिना असतील वर्ग सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाइन वर्ग एक महिन्यापर्यंत होतील. सीबीएसईने यासंबंधीचं परिपत्रक शाळांना पाठवलं आहे. देशात लॉकडाऊन स्थिती आहे. आता तर लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. परिणामी त्यांना अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हे फिटनेस वर्ग उपयोगी ठरणार आहेत. निकालांना होणार विलंब लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर आता सीबीएसई निकालांना विलंब होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तांनुसार सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याच्या विचारात आहे. मात्र सीबीएसईकडून अद्याप याबाबतीत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. पण मूल्यांकन प्रक्रिया आणि काही विषयांच्या परीक्षा थांबल्याने निकालांना विलंब होण्याची दाट शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ceJ3vh
via IFTTT

Post a Comment

0 Comments