मॅथ्सशिवाय कॉमर्सचे 'हे' आहेत पर्याय

१) बी.कॉम्. बी.कॉम्. म्हणजेच बॅचलर ऑफ हा भारतात सर्वात आवडता पदवी अभ्यासक्रम आहे. बारावीनंतर बी. कॉम्. तुम्ही हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम गणित विषय वगळूनही घेऊ शकता. २) बॅचलर इन लॉ लॉ आणि कॉमर्स कॉम्बिनेशन करून तुम्ही ही पदवी घेऊ शकता. विधी क्षेत्रातलं करू शकता. B.Com. LLB, BBA LLB, BA LLB असे विविध पर्याय आहेत. ३) बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन BBA बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यात विद्यार्थी इंडस्ट्रीयल आणि मॅनेजमेंट स्कील्स शिकतात. BBA त विविध स्पेशलाइज्ड प्रोग्रामही असतात. ४) अकाउंटन्सी तुम्हाला अकाउंटन्सी क्षेत्रात रस असेल तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, सर्टिफिकेट मॅनेजमेंट अकाउंटंट हे अभ्यासक्रम निवडू शकता. या अभ्यासक्रमांसाठी गणित विषय अनिवार्य नाही. ५) बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज BMS बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज हा तीन वर्षांचा मॅनेजमेंट कोर्स आहे. यात विद्यार्थी मॅनेजमेंट क्षेत्रातलं करिअर करू शकता. मॅनेजमेंट स्कील्स विकसित करण्यासाठी या अभ्यासक्रमाची मदत होते. ६) कंपनी सेक्रेटरी कंपनी सेक्रेटरी कोर्स हा कॉर्पोरेट प्रोफेशनल कोर्स आहे. MNC किंवा अन्य कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उत्तम करिअरची संधी हा कोर्स देतो. या कोर्ससाठीही गणित विषय अनिवार्य नाही. ७) हॉटेल मॅनेजमेंट कोर्स बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा तीन वर्षांचा कोर्स आहे. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी या कोर्समुळे मिळते. या विविध प्रकारचं स्पेशलायझेशन देखील करता येतं. उदाहरणार्थ, बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ फूड अँड बेवरेजेस प्रोडक्शन, BBA इन हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ केटरिंग मॅनेजमेंट, BA इन कलिनरी आर्ट्स, बीए इन होटेल मॅनेजमेंट. ८) ट्रॅव्हल अँड टुरिझम ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या अभ्यासक्रमासाठी देखील गणित विषयाची आवश्यकता नाही. BBA इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचरल ऑफ ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, BA इन ट्रॅव्हल अँड टुरिझम असे अभ्यासक्रमांचे विविध पर्याय आहेत. ९) बॅचलर इन फॉरन ट्रेड जर तुम्हाला फॉरन ट्रेड सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तर बॅचलर इन फॉरन ट्रेड हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही BBA इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट आणि बीए इन इव्हेंट मॅनेजमेंट आदी पर्यायांचा विचार करू शकता. १०) इव्हेंट मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवल्यानंतरही करिअरच्या चांगल्या संधी आहेत. हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रमा आहे. तुम्ही BBA इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, बीए इन इव्हेंट मॅनेजमेंट यापैकी एक अभ्यासक्रम निवडू शकाल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eerMEq
via IFTTT

Post a Comment

0 Comments