IIT मुंबईची टीम बनवणार कोव्हिड-१९ वर प्रभावी जेल

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं जेल तयार करत आहे. आयआयटी मुंबईद्वारे तयार करण्यात येत असलेलं हे जेल नाकाला लावलं जाऊ शकतं. करोना व्हायरसच्या प्रवेशासाठी नाक हे एक प्रमुख द्वार आहे. या जेलमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा मिळेल पण कोव्हिड - १९ चा जो प्रसार होतोय त्यावरही आळा बसू शकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) अंतर्गत येणाऱ्या एसईआरबी कोव्हिड-१९ व्हायरस निष्क्रिय करण्याचे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी जैव विज्ञान आणि इंजिनिअरींग विभाग (डीबीबी), आयआयटी मुंबईला प्रोत्साहन देत आहे. कोव्हिड-१९ चं संक्रमण पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांना या संसर्गाचा अधिक धोका आहे. आयआयटी मुंबई ज्या रणनीतीवर काम करते आहे ती दोन टप्प्यांतील आहे. नाका, तोंडावाटे फुफ्फुसांतल्या कोशिकांमध्ये हा व्हायरस जाऊन राहतो, म्हणून पहिल्या टप्प्यात याला तेथे जाण्यापासूनच रोखायला हवे. दुसऱ्या टप्प्यात जैविक अणूंचा समावेश करण्यात येणार आहे. डिटर्जंटप्रमाणे व्हायरसला अडकवून निष्क्रिय करता येईल का यावर संशोधन सुरू आहे. या दोन टप्प्यांवर प्रभावी ठरेल असं जेल विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे जेल नाकाच्या छिद्रांना लावलं जाऊ शकतं. डीएसटीचे सचिव आशुतोष शर्मा म्हणाले, 'व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या आपल्या आरोग्य कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांना २०० टक्के सुरक्षेचा हक्क आहे. या नेझल जेलला अन्य उपायांसोबत विकसित केलं जात आहे.' हे तंत्रज्ञान नऊ महिन्यांत विकसित होण्याची शक्यता आहे. डीबीबी, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक किरण कोंडाबगील, प्राध्यापक रिंती बॅनर्जी, प्राध्यापक आशुतोष कुमार आणि प्राध्यापक शमिक सेन या मोहिमेवर काम करत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UYaOT2
via IFTTT

Post a Comment

0 Comments