JEE Main 2020: आता पसंतीचं परीक्षा केंद्र निवडता येणार

नवी दिल्ली: कोव्हिड - १९ मुळे देश लॉकडाऊन स्थितीत आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे मेनच्या विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी आता आपल्या पसंतीचं परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. एनटीएने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनीही हे ट्विट केलं आहे. एनटीएच्या परित्रकात म्हटलं आहे की जेईई मेन अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये विद्यार्थी ज्या क्रमाने परीक्षा केंद्राची निवड करणार आहेत, त्या क्रमानेच त्यांना परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं परीक्षा केंद्र तेव्हाच मिळेल जेव्हा तिथे जागा उपलब्ध असेल. १४ एप्रिल २०२० पर्यंत विद्यार्थी आपल्या अर्जांमध्ये बदल करू शकणार आहेत. यात परीक्षांच्या शहरांच्या पसंतीक्रमाचाही समावेश आहे. अर्जात १४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदल करता येणार आहेत. शुल्क जमा करण्याची मुदत याच दिवशी रात्री ११.५० वाजेपर्यंत आहे. जर अतिरिक्त शुल्काची गरज भासली तर ते तुम्ही क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड/ नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएमद्वारे करू शकता. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे जेईई मेन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच या परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात येईल. एनटीएने नीट यूजी परीक्षाही स्थगित केली आहे. ही परीक्षा ३ मे २०२० रोजी होणार आहे. एनटीएचं परिपत्रक पाहण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aWwhkL
via IFTTT

Post a Comment

0 Comments