MAH MCA CET पुन्हा लांबणीवर

मुंबई: महाराष्ट्रातील मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात पुन्हा स्थगित करण्यात आली आहे. MAH CET ३० एप्रिल रोजी होणार होती. मात्र देशातील १४ एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षेचं नवं वेळापत्रक लॉकडाऊननंतर जाहीर करण्यात येईल. राज्याच्या सीईटी सेलने यापूर्वीही MAH MCA CET सीईटी लांबणीवर टाकली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा मार्च अखेर होणार होती. मात्र पहिल्या लॉकडाऊनमुळे ती एक महिना लांबणीवर टाकत ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन कालावधीत वाढ झाल्याने आता ती पुन्हा अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कॉम्प्युटर अॅप्लिकेशनच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही सीईटी घेतली जाते. ही संगणकआधारित परीक्षा असते. दरम्यान यापूर्वी MHT CET परीक्षाही लांबणीवर पडली आहे. राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी ही CET १३ ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत होणार होती. ती पहिल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणअयात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2xvtosM
via IFTTT

Post a Comment

0 Comments