NEET, JEE च्या अर्ज दुरुस्तीसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली: लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET आणि च्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. अर्जातील दुरुस्ती आणि परीक्षा केंद्र बदलण्याच्या पर्यायासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी ३ मे पर्यंत आपल्या अर्जात दुरुस्ती करू शकणार आहेत आणि आपल्या पसंतीचं परीक्षा केंद्रदेखील निवडता येणार आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांकडून ही मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी आपल्या अर्जांमध्ये ३ मे २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुरुस्ती करू शकणार आहेत, तर शुल्क भरण्यासाठी ३ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंतची मुदत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.nic.in आणि ntaneet.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. एनटीएच्या वेबसाइटवर यासंबंधी एक नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यात लिहिलंय की विद्यार्थी एनटीएच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जे परीक्षा केंद्र निवडतील त्यानुसार त्यांना प्राधान्याने ते परीक्षा केंद्र अलॉट केले जाईल. पण प्रशासकीय कारणांमुळे कुठलं अन्य शहरही दिलं जाऊ शकतं. परीक्षा केंद्र अलॉट करण्याबाबत एनटीएचा निर्णय अंतिम असेल. एनटीएची ही नोटीस वाचण्यासाठी लॉकडाऊनमुळे परीक्षा लांबणीवर करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन होता. आता तो ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व शाळा, कॉलेज, विद्यापीठे, अन्य सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. परीक्षाही सध्या स्थगित आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wEh8pl
via IFTTT

Post a Comment

0 Comments