आयआयटीचे शैक्षणिक वर्ष संपवले

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई लॉकडाउनमुळे विद्यापीठांच्या परीक्षाबाबत निर्णय झाल्यानंतर आता मुंबईनेही शैक्षणिक वर्ष २०१९-२० संपल्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर या शैक्षणिक वर्षाचे मूल्यांकन ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे ठरविले आहे. करोनामुळे आयआयटी कॅम्पसही बंद करण्यात आल्याने सर्व विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी गेलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आयआयटी प्रशासनाने सूचनेद्वारे याबाबत कळ‌वले आहे. या सूचनेत सध्याचे शैक्षणिक वर्ष पूर्ण करणे थोडे अवघड असल्याने आता शैक्षणिक वर्षाचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी संपूर्ण वर्षात झालेल्या परीक्षांच्या आधारे केले जाणार आहे. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करायचा असेल त्यांची मध्यसत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोडायचा आहे त्यांनी ३० मेपर्यंत संस्थेला कळवावे अशी सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ई-लायब्ररीचा रिमोट अॅक्सेस दिला जाणार आहे. सामान्यत: आयआयटीचे शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्येच संपतेच. मात्र यंदा लॉकडाउनमुळे याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले नव्हते. ते आता काढण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X1VYKY
via IFTTT

Post a Comment

0 Comments