आयसीएसईच्या उर्वरित परीक्षा कधी? बोर्डाने दिली माहिती

सीबीएसईनंतर आयसीएसई बोर्डाने देखील दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. काउन्सिल ऑफ द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन () ने आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) च्या उर्वरित परीक्षांबद्दल परिपत्रक जारी केले आहे. या परीक्षा कोणत्या कालावधीत घेतल्या जाणार, कोणत्या विषयांच्या परीक्षा होणार, त्याचं आयोजन कसं केलं जाणार, निकाल कधी जारी होणार याची इत्यंभूत माहिती आयसीएसई बोर्डाने १ मे रोजी दिली. तूर्त आयसीएसईच्या ६ विषयांच्या आणि आयएससी च्या ८ विषयांच्या परीक्षा होणे बाकी आहे. कशा होणार परीक्षा? ISCE 2020 अर्थात दहावीचे उर्वरित पेपर आहेत - भूगोल, एचसीजी पेपर २, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स ग्रुप ३ इलेक्टिव्ह, हिंदी आणि आर्ट पेपर ४ ISC 2020 अर्थात बारावीचे उर्वरित पेपर आहेत - बायोलॉजी पेपर १, बिझनेस स्टडीज, भूगोल, सोशियोलॉजी, सायकॉलॉजी, होम सायन्स पेपर १, इलेक्टिव्ह इंग्लिश आणि आर्ट पेपर ५ आयसीएसी बोर्डाने परिपत्रकात म्हटलं आहे की ६ ते ८ दिवसांत परीक्षा घेतली जाईल. त्यानुसार वेळापत्रक तयार होईल. शनिवारी आणि रविवारीदेखील परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. कधी जारी होणार वेळापत्रक? दोन्ही इयत्तांच्या सर्व विषयांच्या वेळापत्रकासंदर्भातही परिपत्रकात माहिती देण्यात आली आहे. बोर्डाची परीक्षा सुरू होण्याआधी आठ दिवस वेळापत्रक जारी करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. वेळापत्रक सर्व शाळांच्या सीआयएससीईच्या करिअर पोर्टलवर तसेच इमेलवर पाठवण्यात येईल. काऊन्सिलच्या वेबसाइटवरही वेळापत्रक असेल. निकाल कधी? बोर्डाने सांगितलं आहे की उर्वरित परीक्षा संपल्यानंतर सुमारे ६ ते ८ आठवड्यांच्या आत निकाल जारी केला जाईल. यादरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी इयत्तेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल. आयसीएसई बोर्डाचं परिपत्रक वाचण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SrzBgq
via IFTTT

Post a Comment

0 Comments