Also visit www.atgnews.com
IGNOU च्या रेडिओद्वारे शिका परदेशी भाषा
लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरबसल्या शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ने ही सुविधा तुमच्यासाठी आणली आहे. आजकाल अनेक कंपन्यांमध्ये विदेशी भाषा शिकण्याच्या कौशल्याला प्राधान्य दिलं जातं. याव्यतिरिक्त अनेक वैज्ञानिक शोधही हे सांगतात की जास्त भाषा शिकल्याने मेंदू तल्लख होतो. संवाद कौशल्य वाढतं. या भाषा शिकण्याची संधी इग्नूने दिली आहे. इग्नूने सध्या दोन परदेशी भाषांपासून हा कार्यक्रम सुरू केला आहे. या भाषा आहेत कोरियन आणि पर्शियन. इग्नूने हा कार्यक्रम आपला रेडिओ ज्ञान वाणी वर सुरू केला आहे. तुम्ही तुमच्या मोबाइलवर ज्ञान वाणी अॅप डाऊनलोड करून हा कार्यक्रम ऐकू शकाल. ज्ञान वाणीचे स्टेशन मॅनेजर मनोज कुमार सिंह याने सांगितले की कोरियन आणि पर्शियन भाषा शिकण्याचा कार्यक्रम १ मे पासून सुरू झाला आहे. ज्ञान वाणी एफएम वर 105.6 MHz वर ट्यून करून ऐकू शकता. या भाषांमध्ये रोज सकाळी ९ ते ९.३० या वेळेत हे कार्यक्रम प्रसारित केले जातील. कुठे बोलल्या जातात या भाषा? कोरियन - ही दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आणि चीनमधील अधिकृत भाषा आहे. याव्यतिरिक्त उझबेकिस्तान, कॅनडा आणि जपानमध्ये कोरियन भाषा बोलली जाते. पर्शियन - ही भाषा इराण, तझाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तानात बोलली जाते. इराण, तझाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांची ही अधिकृत भाषा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2zQSTWl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments