Also visit www.atgnews.com
BHU प्रवेश परीक्षा: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय
Exam 2020: बनारस हिंदू विद्यापीठाने (बीएचयू) यावेळी प्रवेश परीक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदा बीएचयू प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने परीक्षा केंद्राच्या शहराचा पर्याय बदलण्याची सुविधा दिली आहे. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचनाही जारी केली आहे. विद्यापीठाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की या अधिसूचनेमध्ये परीक्षा शहराचा पर्याय बदलण्याच्या पद्धतीविषयीदेखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परीक्षा शहराचा पर्याय कसा बदलायचा? यासाठी प्रथम बीएचयू प्रवेश परीक्षा पोर्टल bhuonline.in वर जा. रजिस्ट्रेशन आयडी आणि अन्य माहिती भरुन लॉग इन करा. आपल्या अर्जामध्ये परीक्षा शहर पर्यायावर जा. यादी उघडेल. त्यामध्ये दिलेल्या पर्यायांमधून आपले प्राधान्य निवडा. नंतर सेव्ह करुन सबमिट करा. हे बदल तुम्ही एकदाच करू शकता. म्हणून पर्याय काळजीपूर्वक निवडा. हेही वाचा: विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया २० जून २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर केंद्र बदलाशी संबंधित कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. असंही सांगण्यात आलं आहे की तुम्ही निवडलेल्या शहरातील जागा भरल्या गेल्या असतील तर त्या शहरापासून २०० किमी अंतराच्या आत अन्य शहर तुम्हाला परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2N8fxg1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments