Also visit www.atgnews.com
IGNOU ने पुन्हा वाढवली असाइनमेंट सबमिशन मुदत
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने ( ) असाइनमेंट सादर करण्याची तारीख पुन्हा वाढविली आहे. आता विद्यार्थी ३० जूनपर्यंत असाइनमेंट सादर करू शकतात. करोनाव्हायरस (Covid-19) संक्रमणाच्या स्थितीत अजून सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परीक्षा फॉर्म, असाइनमेंट आणि प्रकल्प सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून, २०२० पर्यंत वाढविली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जून २०१९ मध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतता होता, ते जून २०२० च्या टर्म एंड परिक्षेला हजेरी लावणार होते. परंतु कोविड - १९ साथीच्या आजारामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता परीक्षेचे वेळापत्रक नव्याने विद्यापीठाने निश्चित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना असाइनमेंट सादर करण्यात अडचण येऊ नये म्हणून इग्नूने यंदा ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना असाइनमेंट लिहून, ती स्कॅन करुन त्यांच्या संबंधित ईमेल पत्त्यावर प्रादेशिक केंद्रांवर पाठविण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांचं प्रोजेक्ट वैयक्तिकरित्या अभ्यास केंद्रांमध्ये सादर करावे लागत होते. लॉकडाऊनमुळे देशभर पसरलेल्या इग्नूच्या सर्व ५६ प्रादेशिक केंद्रांवरील सर्व कामकाज स्थगित करण्यात आले आहे. इग्नूमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी, प्रमाणपत्र आणि पदविका स्तरावर सुमारे २७७ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30QfSMz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments