Also visit www.atgnews.com
बारावी मराठीसाठी शिक्षकांनी बनवले अॅप
म.टा. प्रतिनिधी, पुणे करोनामुळे शाळा-कॉलेज सुरू झाले नाही, तरी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठीच्या अभ्यासात खंड पडू नये, यासाठी काही शिक्षकांनी खास मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. ओंजळ नावाचे हे ॲप सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. `शाळा नाही, शिक्षण सुरू`, हे या शैक्षणिक वर्षाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. काहींचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन बारावी मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही `ओंजळ` हे ॲप तयार केले आहे. यात पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ, पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक यांवर विवेचन, पीपीटी, कृती आणि दृक्-श्राव्य फीत (व्हिडिओ) दिसणार आहे. या व्हिडिओंची निर्मिती शिक्षकांनीच केली आहे. त्याचबरोबर काही व्हिडिओ त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून मागवून घेतले आहेत, अशी माहिती डॉ. सुजाता शेणई व शीतल सामंत यांनी दिली. बालभारतीच्या बारावी मराठी भाषा पाठ्यपुस्तक अभ्यासगटातील सदस्य डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद, सुचेता नलावडे, रेणू तारे आणि आरती देशपांडे यांनी हे ॲप विकसित केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर `ओंजळ` हा शब्द लिहून हे ॲप डाउनलोड करता येईल. एखाद्या पाठाचा अथवा घटकाचा विचार कसा करावा आणि तो स्वतःच्या भाषेत अभिव्यक्त कसा करावा हे यातून समजेल, असे डॉ. शेणई व सामंत यांनी सांगितले. मान्यवरांचा सहभाग `ओंजळ` या ॲपचे वेगळेपण म्हणजे पाठ्यपुस्तकातील कवी वसंत आबाजी डहाके, लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले व हिरा बनसोडे यांनी या ॲपसाठी टिपणे लिहिली आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2B0cljO
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments