Also visit www.atgnews.com
NIRF India Ranking 2020: IIT मद्रास देशात टॉप
India Ranking: देशातल्या शिक्षण संस्था गेले काही दिवस ज्याची आतुरतेने वाट पाहत होत्या ते राष्ट्रीय रँकिंग म्हणजेच NIRF India Ranking ची आज घोषणा करण्यात आली. आयआयटी मद्रास ही देशातील सर्वोत्तम शिक्षणसंस्था ठरली आहे. यंदा प्रथमच डेंटल महाविद्यालयांचाही यात समावेश करण्यात आला आहे. या विभागात तिसऱ्या क्रमांकावर डी.वाय. पाटील महाविद्यालयाने स्थान पटकावले आहे. नॅशनल इस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्वीकारून २९ सप्टेंबर २०१५ रोजी लाँच केले होते. पाया रँकिंगचं हे पाचवं वर्ष आहे. सुरुवातीला चार विभागात ही क्रमवारी जाहीर केली जात होती. याची व्याप्ती आता वाढवली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हेही या ई अनाउन्समेंटच्या वेळी ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी एनआयआरएफच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. पोखरियाल यांनी NIRF India Ranking च्या घोषणेबाबतचं लाइव्ह प्रक्षेपण त्यांच्या ट्विटर हँडलवरून केलं. त्याची लिंक पुढे देण्यात आली आहे - विद्यापीठे, अभियांत्रिकी संस्था, महाविद्यालये, व्यवस्थापन संस्था, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ अशा विविध अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या बाबतीत हे रँकिंग केले जाते. संस्थांमधील अध्यापन, सोयी-सुविधा, संशोधन, पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी विविध विविध निकषांवर ही क्रमवारी दिली जाते. एमएचआरडीचे अधिकृत संकेतस्थळ nirfindia.org वर ही रँकिंग उपलब्ध असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37iTGfr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments