Also visit www.atgnews.com
परीक्षा रद्द करा; आता आयसीएसईच्या पालकांचाही विरोध
सीबीएसईमागोमाग आता बोर्डाच्या पालकांनीही परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. शुक्रवारी १२ जून रोजी सकाळी ट्विटरवर ही मोहिम सुरू झाली. #Cancel10thICSEboards या हॅशटॅगसह सुमारे २८ हजार टि्वटर मेन्शन होते. एक ते दीड तास हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालक असलेल्या सहा महिलांनी ही मोहिम सुरू केली आहे. या सहाही पालक दिल्लीतील आहबेत. त्यांच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा १ ते १४ जुलै या कालावधीत होणार आहेत. या परीक्षा लॉकडाऊन काळात लांबणीवर पडल्या होत्या. त्या घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला, पण बरेचसे पालक बोर्डाच्या या निर्णयावर समाधानी नाहीत. परीक्षा रद्द व्हाव्या यासाठी अनेक ऑनलाइन याचिकाही दाखल झाल्या आहेत. '१९ मार्च २०२० रोजी आयसीएसई बोर्डाने सर्व परीक्षा स्थगित केल्या. त्यावेळी दहावीचे सहा विषयांचे पेपर शिल्लक होते (ही संख्या विद्यार्थ्यांगणिक बदलू शकते कारण विविध विद्यार्थी विविध विषय निवडतात.) त्यावेळी देशभरात करोना संक्रमणाच्या २३६ केसेस होत्या. आता देशभरात सुमारे ३ लाख ज्ञात कोविड - १९ संसर्ग झालेले रुग्ण आहेत. आणि अशा वेळी बोर्डाने सांगितले आहे की उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात घेतल्या जातील,' असं या पालकांनी केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. या सहा मातांनी या मोहिमेच्या समर्थनार्थ व्हॉट्स अप ग्रुप तयार केले. काही तासांत २३०० हून अधिक पालक या ग्रुपमध्ये जॉइन झाले. पाल्यांच्या आरोग्याची काळजी असल्याने परीक्षांना विरोध करत असल्याचे या पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षांनाही पालकांचा विरोध आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा येत्या १ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकी सीबीएसई बारावीच्या परीक्षा देशभर होणार आहेत. या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आता पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशभरात कोविड - १९ च्या वाढत्या संक्रमणामुळे या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत अशी पालकांची मागणी आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37ocBFp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments