आयसीएसई परीक्षांना परवानगी देणार नाही; राज्य सरकार ठाम

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा महाराष्ट्रात घेण्यास परवानगी देणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडली. दरम्यान, यासंदर्भातील पुढील सुनावणी सोमवारी २९ जून रोजी होणार आहे. आयसीएसईची दहावीची उर्वरित विषयांची परीक्षा २ ते १२ जुलै दरम्यान आणि बारावीची उर्वरित परीक्षा १ ते १४ जुलै दरम्यान घेण्याचे बोर्डाने जाहीर केले होते. मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा धोका वाढतच असल्याने त्याविषयी चिंता व्यक्त करतानाच अशा परिस्थितीत आयसीएसई बोर्डच्या दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षेविषयी परवानगी देणार की नाही, याबद्दल राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्य न्यायूमर्ती दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने दिले होते. त्याप्रमाणे राज्याचे माहाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. हा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला.. त्यामुळे खंडपीठाने त्या बैठकीचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी सोमवारी ठेवली. सुप्रीम कोर्टात याच विषयावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार बहुदा आज संध्याकाळपर्यंत याप्रश्नी निर्णय घेईल, असे संकेत केंद्र सरकारतर्फे भूमिका स्पष्ट करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z1ReGl
via IFTTT

Post a Comment

0 Comments