Also visit www.atgnews.com
परीक्षांबाबत देशपातळीवर सामायिक निर्णय होणार?
नवी दिल्ली: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय बोर्ड परीक्षांबाबत सोमवार २२ जून रोजी संपूर्ण देशासाठी सामायिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोविड - १९ संक्रमण स्थितीमुळे प्रलंबित असलेल्या बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षांबाबत सर्व राज्यांसाठी सामायिक निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीएसई परीक्षांसंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी देताना परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रलंबित आहेत. बोर्डाने त्या जुलै महिन्यात आयोजित केल्या आहेत. मात्र अनेक पालक संघटनांचा या निर्णयाला विरोध आहे. काही पालकांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी २३ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी बोर्डाला परीक्षांबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल. अनेक राज्यांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाही जुलै महिन्यात होऊ घातल्या आहेत. मात्र दुसरीकडे करोना संक्रमणाच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. उलट दिवसेंदिवस संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत यापूर्वी मार्च - एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या आयोजनावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. सीबीएसईसह आयसीएसई आणि काही राज्य मंडळांनी देखील परीक्षांचे नियोजन केले आहे. देशातील अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी जेईई मेन, नीट यूजी यासारख्या परीक्षादेखील जुलै महिन्यात होणार आहेत. या सर्वच परीक्षांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून सामायिक निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dm4URy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments