Also visit www.atgnews.com
सीबीएसईने मागवले सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांसाठी अर्ज
सर्वोत्कृष्ट शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वार्षिक पुरस्कारासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शिक्षक आणि मुख्याध्यापक पुरस्कार २०१९ साठी अर्ज मागविले आहेत. हे पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी दिले जातात. विजेत्यांना ५० हजार रुपये मिळतील. विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रही मिळेल. इच्छुक उमेदवार सीबीएसईच्या .nic.in या अधिकृत संकेतस्थळावर १० जुलै किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. पात्रता सीबीएसई मान्यताप्राप्त शाळेत किमान १० वर्षे शिकवण्याचा अनुभव असणारे शिक्षक आणि १० वर्षे शिकवण्याचा आणि पाच वर्षे मुख्याध्यापक पदाचा अनुभव असणारे मुख्याध्यापक या पुरस्कारांसाटी अर्ज करू शकतात. ज्यांनी यापूर्वी अर्ज केला होता आणि पुरस्कार मिळालेला नाही, असे उमेदवार पुन्हा अर्ज करू शकतात. ज्या शिक्षक किंवा मुख्याध्यापकांना यापूर्वी सीबीएसई टीचर्स अवॉर्ड मिळाला होता ते आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. जे उमेदवार शॉर्टलिस्ट झालेत त्यांची कागदपत्रे तपासण्याचे काम एक राष्ट्रीय स्तरावरील समिती करेल. ही समिती गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करेल. टॉप ६ नावे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी पाठवली जातील. उमेदवारांनाी त्यांची पात्रता, शिक्षण क्षेत्रातील योगदान, सहकाऱ्यांचे मार्गदर्शन, मागील १० वर्षांच्या कार्याचा आढावा, समुदायाप्रति योगदान, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेले कार्य आदींच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. अर्ज कसा कराल? - अर्जासाठी - नंतर continue वर क्लिक करा. - वर Register हा पर्याय असेल, तेथे क्लिक करून नोंदणी करा. - नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून सर्व तपशील भरून अर्ज करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eA4Mzz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments