सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता ऑगस्टमध्ये होणार

अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव, प्रोफेशनल प्रोग्राम आमि पोस्ट मेंबरशीप क्वालिफिकेशन परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकली आहे. सीएसची जून परीक्षा यापूर्वी एक लांबणीवर टाकत जुलै महिन्यात आयोजित केली जाण्याची घोषणा करण्यात आली होती. आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. १८ ते २८ ऑगस्ट २०२० दरम्यान घेतली जाणार आहे. आयसीएसआय या परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन क्रॅश कोर्सही चालवत आहे. याचे वर्ग २ जुलैपर्यंत चालणार आहे. आयसीएसआयच्या विद्यावाहिनी कार्यक्रमांतर्गत हे वर्ग घेण्यात येत आहेत. यापूर्वीही सीएस जून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १ जून ते १० जून दरम्यान या परीक्षा होणार होत्या. लॉकडाउन असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. कंपनी सेक्रेटरी पदाच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येतात. यामध्ये फाऊंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनलचा समावेश आहे. आयसीएसआय मे-जून परीक्षेचे वेळापत्रक काही विद्यार्थ्यांना दिले होते. मात्र, परिस्थितीचा विचार करत या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर नव्या वेळापत्रकाप्रमाणए ६ जुलैपासून या परीक्षा होणार होत्या. मात्र करोना संक्रमणाची स्थिती गंभीर होत असल्याने जुलैमधील परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संस्थेने यासंदर्भातली माहिती ट्विटरवरूनदेखील दिली आहे...


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hknfBX
via IFTTT

Post a Comment

0 Comments