राज्यात जुलैमध्ये परीक्षा; आयसीएई बोर्डाची कोर्टात माहिती

मुंबई: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE) बोर्डाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की बोर्ड सुरक्षिततेची सर्व प्रकारची खबरदारी घेत जुलै महिन्यात महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा घेत आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र याला आक्षेप घेतला आहे. जुलैमध्ये परीक्षा घेणे कोविड - १९ महामारीच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत योग्य नाही, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी आता पुढील आठवड्यात होणार आहे. कुंभकोणी म्हणाले, 'कोविड-१९ प्रादुर्भावाची महाराष्ट्रातील स्थिती गंभीर आहे. म्हणून असा परिस्थितीत आयसीएसई बोर्डाने प्रलंबित परीक्षा घेणे योग्य होणार नाही.' आयसीएसई बोर्डाने कोर्टाला एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात असा दावा केला आहे की परीक्षा आयोजित करण्यासाठी बोर्डाला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी दिली. अरविंद तिवारी या याचिकाकर्त्याने आयसीएसई बोर्डाच्या महाराष्ट्रात परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. बोर्डातर्फे राज्यात २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत दहावीच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ फेब्रुवारी २०२० ते ३० मार्च २०२० या कालावधीर होणार होती, मात्र १९ मार्चनंतरच्या परीक्षा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे बोर्डाने स्थगित केल्या होत्या. तिवारी यांनी याचिकेद्वारे अशी मागणी केली आहे की कोविड-१९ चा प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत असल्याने येथे आयसीएसईने परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मागील कामगिरीच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन करत गुण द्यावेत. हेही वाचा: महाराष्ट्रात आयसीएसई बोर्डाच्या २२६ शाळा आहेत. यातील २३,२४७ विद्यार्थी यावर्षी दहावीला आहेत. आयसीएसी बोर्डाने प्रतिज्ञापत्रात लिहिल्यानुसार, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उर्वरित परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने ३ जून रोजी सांगितले की राज्यातील करोनास्थितीमुळे परीक्षाांना परवानगी देणे शक्य नाही. परीक्षा एकतर पुन्हा लांबणीवर टाकाव्यात किंवा अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचे निकाल लावावे. हेही वाचा: आयसीएसई बोर्ड मात्र संपूर्ण खबरदारीसह परीक्षा घेण्याच्या भूमिकेत आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला तो कोविडग्रस्त असल्याने किंवा त्याचे कुटुंबीय संक्रमित असल्याने जर परीक्षा देता आली नाही तर असे विद्यार्थी सप्टेंबर २०२० मध्ये पुन्हा परीक्षा देऊ शकतील, असे बोर्डाने म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पुढील आठवड्यात होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2B8nJtW
via IFTTT

Post a Comment

0 Comments