दिल्ली विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

UG, PG admission 2020: दिल्ली विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया शनिवारी २० जूनपासून सुरू झाली आहे. du.ac.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. दोन दिवसात सुमारे १ लाख ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या दिवशी २५,८८९ विद्यार्थ्यांनी तर दुसऱ्या दिवशी ७८,२२० विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी अर्ज केले आहेत. यापैकी बहुतांश अर्ज (७६,८५५) पदवीपूर्व म्हणजेच यूजी अभ्यासक्रमांसाठी आले आहेत. ही प्रवेश प्रक्रिया ४ जुलैपर्यंत सुरू राहाणार आहे. यंदा विद्यापीठाने करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. प्रक्रियेत विद्यार्थीहिताचे अन्य अनेक बदलही विद्यापीठाने केले आहेत. डीयूची वेबसाइट नोंदणीसाठी दोन टप्प्यात उघडली जाणार आहे. सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही वेबसाइट नोंदणीसाठी खुली करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थी आपले गुण अपलोड करू शकतील. याव्यतिरिक्त पीजी अभ्यासक्रमांसाठी देखील मुलाखती होणार नाहीत. मागील वर्षीपर्यंत मुलाखतींचं वेटेज १५ टक्के होतं.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2CraOEd
via IFTTT

Post a Comment

0 Comments