Also visit www.atgnews.com
विद्यार्थ्यांना मूल्यांकनाचे 'योग्य सूत्र' कधी कळणार: आशिष शेलार
पदवी परीक्षांवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षातल्या संघर्षाची धार अद्याप बोथट झालेली नाही. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी पुन्हा परीक्षांसंदर्भातले काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पदवी परीक्षा न देण्याचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना मूल्यांकनाचे 'योग्य सूत्र' कधी कळणार, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. पदवी परीक्षा मूल्यांकनासंदर्भातले 'योग्य सूत्र' १५ दिवसांत ठरणार का? परीक्षा देत नसल्याची लेखी हमी देण्याआधी विद्यार्थ्यांना हे 'योग्य सूत्र' कळेल का? राज्यातील सर्व विद्यापीठांचे योग्य सूत्र एकच असेल का? असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबतही भाजप सुरुवातीपासून प्रश्न विचारत आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय ही पंधरा दिवसात होणार का? व्यावसायिक अभ्यासक्रमांचा निर्णय कधी व कसा होणार? गुण सुधारणा कार्यक्रम कधी जाहीर करणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे तातडीने आता तरी देऊन संभ्रम दूर करणार का? असा प्रश्नांचा भडीमार शेलार यांनी टि्वटरवरून केला आहे. आम्ही सातत्याने हे प्रश्न सरकारला विचारत राहणार असं त्यांनी लिहिलंय. उच्च शिक्षणमंत्री अहंकारी: शेलार विद्यार्थ्यांचे, कुलपती, कुलगुरुंचे म्हणणे न ऐकणारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री अहंकारी असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. त्यासाठी तुकारामांचा एक अभंगच त्यांनी ट्विट केला आहे. गेले काही दिवस राज्यातील विद्यापीठांच्या पदवी परीक्षांवरून राजकारण सुरू आहे. परीक्षा न घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे, असं म्हणत राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. याला भाजप कडाडून विरोध करत आहे. पदवी स्तरावरील परीक्षा रद्द करणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याची भाजपची भूमिका आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ANGnb6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments