'या' राज्याने रद्द केल्या यूजी/पीजी अंतिम परीक्षा

मेडिकल, पॅरामेडिकल आणि फार्मसी अभ्यासक्रम वगळता अन्य सर्व यूजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा राज्याने रद्द केल्या आहेत. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये रद्द केलेल्या या परीक्षांसाठी एक वैकल्पिक मूल्यांकन पद्धती अवलंबण्यात येणार आहे. या पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांना त्या विषयातील मागील सेमिस्टरमध्ये मिळालेले गुण, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण यांच्या सरासरीइतके गुण दिले जातील. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षांचे निकाल ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर केले जाणार आहेत. ज्या विद्यापीठांमध्ये अंतिम सत्राच्या प्रॅक्टिकल परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांनी मागील सेमिस्टरच्या प्रॅक्टिकल परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीइतके गुण द्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार करायचा आहे, ते विशेष परीक्षेसाठी बसू शकतात. ही परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये होणार आहे. या परीक्षेचा निकाल डिसेंबर २०२० पर्यंत जाहीर होणार आहे. ज्यांना केवळ दोन बॅक पेपर द्यायचे आहेत (एटीकेटी) त्यांचे पेपरही रद्द केले जाणार आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश राज्य मंडळाने बारावीचा निकाल आज जाहीर केला. उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.०७ आहे. कुल्लु येथील प्रकाश कुमार या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने ९९.४ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गोवा राज्यातील बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. तामिळनाडू हे राज्य बारावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UWscHi
via IFTTT

Post a Comment

0 Comments