Also visit www.atgnews.com
यूपीएससी एनडीए परीक्षेची अधिसूचना 'या' दिवशी
केंद्रीय लोकसेवा आयोग () एनडीए आणि एनए परीक्षा 2 संदर्भातले नोटिफिकेशन १६ जून रोजी जारी करणार आहे. यासंदर्भत यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर मेसेज जारी करण्यात आला आहे. २ परीक्षा २०२० साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना १६ जून पर्यंत अपडेट्सची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अलीकडेच यूपीएससीने परीक्षांचे रिवाइज्ड कॅलेंडर जारी केले होते. त्यानुसार, यूपीएससी एनडीए २ २०२० परीक्षा आता ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. पात्रता अर्जदार भारत, नेपाळ किंवा भूतानचा नागरीक असावा. १ जानेवारी १९६२ च्या आधी भारतात कायमस्वरुपी आलेले तिबेटी शरणार्थी असावेत. उमेदवार भारतात कायमस्वरुपी राहण्याच्या हेतूने भारतचे मूळ निवासी पाकिस्तान, श्रीलंका, केनिया, टांझानिया, युगांडा, मलावी, झांबिया, जायरे आणि इथियोपिया किंवा व्हिएतनामवरून प्रवास करून आलेला असावा. वयोमर्यादा १६ ते १९ वर्षे वैवाहिक स्थिती अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचं वचन देणं अपेक्षित आहे. शैक्षणिक पात्रता आर्मीसाठी - १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उर्तीर्ण. वायू दल आणि नौदलासाठी - १२ वी किंवा समकक्ष परीक्षा फिजिक्स किंवा मॅथ्स घेऊन उत्तीर्ण. परीक्षा पॅटर्न एका लेखी परीक्षेनंतर अंतिम मुलाखत. एनडीएसाठी लेखी परीक्षेत दोन विभाग असतात. ३०० गुणांची गणित आणि ६०० गुणांची जनरल अॅबिलीटी टेस्ट असते. दोन्ही परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात. मुलाखतीसाठी ९०० पैकी गुण असतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e44C2M
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments