'या' राज्यातील शाळा, महाविद्यालये उघडणार ऑगस्टमध्ये

शाळा, कॉलेजांच्या रिओपनिंगबाबत विविध राज्यांतील परिस्थिती वेगवेगळी आहे. कोविड - १९ च्या प्रादुर्भावाचं प्रमाण जसंजसं वाढत वा कमी होत आहे त्यानुसार राज्ये शाळा, कॉलेज, परीक्षांबाबत आपापल्या स्तरावर निर्णय घेत आहेत. महाराष्ट्रातील करोना संक्रमणाच्या स्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी विविध जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शाळा सध्या तरी ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. सिक्किम सरकारने देखील शिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. या राज्यात आता ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरू होतील. मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील शाळा-कॉलेज १ जुलै पासून सुरू करण्याचा निर्णय झाला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, शाळा-कॉलेज सुरू करण्यात येतील, असं सरकारने जाहीर केलं आहे. हेही वाचा: दरम्यान, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा मात्र जुलै महिन्यात होणार आहेत. देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर या प्रलंबित परीक्षा घेण्याचा निर्णय या बोर्डांनी घेतला आहे. त्याला पालकांकडून विरोध होत आहे. कोविड - १९ चे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलैमध्ये परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असे पालकांचे म्हणणे आहे. काही पालकांनी न्यायालयाचे दारही ठोठावले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2AtZzdM
via IFTTT

Post a Comment

0 Comments