मुंबई उच्च न्यायालय, गोवा येथे भरती

मुंबई उच्च न्यायालय, गोवा येथे वैयक्किक सहाय्यक, शॉर्टहँड रायटर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची अखेरची मुदत १३ जुलै २०२० आहे. काय आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा आणि कुठे करायचा, किती परीक्षा शुल्क आहे यासंबंधीची सर्व माहिती, शिवाय अर्ज करण्यासाठी थेट लिंक आदी माहिती या वृत्तात आम्ही देत आहोत. शैक्षणिक पात्रता वैयक्तिक सहाय्यक पद - पदवी (हायकोर्टात उच्च वा कनिष्ठ श्रेणी स्टेनोग्राफर पदाचा अनुभव असल्यास शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल होणार), याशिवाय टायपिंग, शॉर्टहँड कौशल्य (सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये वाचावी.) शॉर्टहँड रायटर - पदवी (लॉची पदवी असल्यास प्राधान्य.) याशिवाय टायपिंग, शॉर्टहँड कौशल्य (सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये वाचावी.) कोंकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा - २१ ते ४५ वर्षे. एकूण पदे - ६ नोकरीचे ठिकाण - गोवा अर्ज कुठे करायचा? मुंबई उच्च न्यायालय, गोवा कुलसचिव (प्रशासन), गोवा येथील मुंबई उच्च न्यायालय, लायसियम कॉम्प्लेक्स, आल्तिनो, पणजी, गोवा - ४०३००१ शुल्क वैयक्तिक सहाय्यक पदाकरिता ६०० रुपये शुल्क आहे. शॉर्टहँड राइटर पदाकरिता ५०० रुपये शुल्क आहे. या भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, गोवाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी अर्जाचे प्रिंट घेण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ULWqwC
via IFTTT

Post a Comment

0 Comments