DU चं अॅडमिट कार्ड जारी; 'असं' करा डाऊनलोड

दिल्ली विद्यापीठाच्या यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांसाठी दिल्ली विद्यापीठाने अॅडमिट कार्ड जारी केले आहे. परीक्षा फक्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. उर्वरित सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन किंवा असाईनमेंट-आधारित मूल्यांकनाच्या आधारे पुढील सत्रात प्रमोट केले जाईल. प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे १. डीयूच्या अधिकृत वेबसाइट examportal.duresult.in वर जा. २. अॅडमिट कार्ड डाऊनलोडच्या लिंक वर क्लिक करा. ३. कॉलेजचे नाव, परीक्षा रोल नंबर, तुमचे नाव व प्रवेश पत्र आदी माहिती भरा. ४. मग जनरेट अॅडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करा. ५. तुमचे अॅडमिट कार्ड दिसेल. भविष्यातील वापरासाठी, कार्ड डाउनलोड करा आणि एक प्रिंटआउट घ्या. अॅडमिट कार्ड विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून एसएमएसद्वारे पाठविली जाईल. अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यात काही अडचण येत असल्यास edpcellexam@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधा. पेपर पॅटर्न डीयूच्या ओपन बुक संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे, त्यानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेत ६ प्रश्न असतील, त्यापैकी ४ प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील. प्रश्नपत्रिका हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत दिली जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी पेपर सेट करताना घेण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे डीन डॉ. विनय गुप्ता यांनी सर्व विभाग प्रमुखांना सांगितले आहे की प्रश्नपत्रिका ७५ गुणांची असेल. सीबीसीएस / ३ वर्षाच्या सेमिस्टर योजनेच्या आधारे पेपर तयार करण्यास सांगितले गेले आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये काय होते? दिल्ली विद्यापीठाने ओपन बुक परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे सर्व विभाग प्रमुखांव्यतिरिक्त स्कूल ऑफ ओपन लर्निंग (SOL) आणि नॉन-कॉलेजिएट महिला शिक्षण मंडळाला (NCWEB) पाठविली गेली आहेत. डीयूच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ओपन बुक परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार नाही. यामध्ये इंटरनेटची आवश्यकता खूप कमी भासेल. विद्यार्थ्यांना केवळ पेपर डाउनलोड करण्यासाठी आणि त्यांची उत्तरपत्रिका अपलोड करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. कोणत्याही स्मार्टफोनचा वापरही यासाठी विद्यार्थ्यांना करता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fnJQLP
via IFTTT

Post a Comment

0 Comments