JEE Mock Test: सरावासाठी भरपूर प्रश्नपत्रिका

अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन) १८ ते २३ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटींमधील इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी ही जेईई मेन प्रवेश परीक्षा घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटीत शिकण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेला बसतात. विद्यार्थ्यांकडे परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे अतिरिक्त वेळ आहे. तयारीसाठी याचा उत्तम वापर करण्याची संधी आहे. स्मार्ट प्रीपरेशन ही यशाची पहिली पायरी आहे. केवळ घोकंपट्टीपेक्षा संकल्पना डोक्यात शिरणं हे केव्हाही कोणत्याही अभ्यासाचा गाभा असतं. विषय समजला तर तो तुम्हाला परीक्षेच्या वेळी आठवायला मदत होते. तेथे घोकंपट्टी कामी येत नाही. म्हणून जास्तीत जास्त मॉक टेस्ट देणं केव्हाही उत्तम. त्यामुळे तुमचा परीक्षेच्या वातावरणाचाही सराव होतो. नॅशनल डिजीटल लायब्ररी ऑफ इंडियाने विविध प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध केल्या आहेत. तुमच्या सरावासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला सराव प्रश्नपत्रिकांच्या काही लिंक्स - जेईई मेन किंवा एनईईटी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आपण पुढील क्रमांकांवर नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजेच एनटीएशी थेट संपर्क साधू शकता - 8287471852 8178359845 9650173668 9599676953 8882356803


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BOiNLn
via IFTTT

Post a Comment

0 Comments