MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची उत्तरतालिका जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य नागरी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ ची अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. पेपर १ आणि २ साठीची अंतिम उत्तरतालिका गुरुवारी ११ जून २०२० रोजी जाहीर झाली. https://ift.tt/29NyjVD या संकेतस्थळावर ही उत्तरतालिका उमेदवारांना पहायला मिळेल. जे उमेदवार परीक्षेला बसले होते ते ए, बी, सी आणि डी संचाची उत्तरे पडताळून पाहू शकतात. ही उत्तरतालिका पीडीएफ फाइलच्या स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. सिव्हिल इंजिनीअरिंग परीक्षेविषयी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा ही पेन-पेपर परीक्षा आहेत. राज्य सरकारच्या पाणी स्रोत विभाग, बांधकाम आणि पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग या विभागांमधील सहाय्यक नागरी अभियंता पदांवरील भरतीसाठी ही परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येते. या सेवा परीक्षा प्रामुख्याने दोन विभागात होतात. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा - गट अ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा - गट ब उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षांपर्यंत हवे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा समकक्ष पदवी असलेले उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रक्रियेतील सहाय्यक अभियंता पदासाठी भरती लेखी परीक्षेमार्फत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही लेखी परीक्षा घेतली जाते. यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती होतात. मुलाखत आणि लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड होते. लेखी परीक्षा पूर्व आणि मुख्य अशी दोन टप्प्यांमध्ये होते. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hoJE0H
via IFTTT

Post a Comment

0 Comments