NIRF Ranking 2020: देशातील टॉप १० विद्यापीठे

Top 10 Indian Universities: देशातली सर्वोत्तम दहा विद्यापीठे कोणती ठाऊक आहे? आम्ही तुम्हाला येथे देत आहोत देशातल्या टॉप १० विद्यापीठांची पूर्ण यादी. ही यादी भारताच्या सर्वात प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त रँकिंग - एनआयआरएफ रँकिंगच्या आधारवर तयार करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी ११ जून २०२० रोजी या वर्षीची NIRF रँकिंग जारी केली. विद्यापीठ, कॉलेज, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था यांच्यातून एकत्रितपणे सर्वोत्तम संस्थांना तर रँक देण्यात आलाच, शिवाय विविध विभागातील रँकिंगही जाहीर झाले. विद्यापीठांचाही एक स्वतंत्र विभाग होता. यात देशातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांचा समावेश आहे. येथे तुमच्या माहितीसाठी भारतातील टॉप १० विद्यापीठांची यादी दिली जात आहे. कोणत्या विद्यापीठाला १०० पैकी किती गुण मिळाले, तेही येथे देत आहोत. सोबतच संपूर्ण यादी पाहण्याची थेट लिंकही दिलेली आहे. भारताच्या टॉप १० विद्यापीठांची नावे -
रँक विद्यापीठाचे नाव आणि ठिकाण स्कोर (१०० पैकी)
०१ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc Bangalore) ८४.१८
०२ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नई दिल्ली (JNU) ७०.१६
०३ बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी (BHU) ६३.१५
०४ अमृता विश्व विद्यापीठम, कोइम्बतूर (Amrita Vishwa Vidyapeetham) ६२.२७
०५ जादवपुर विद्यापीठ, कोलकाता (Jadavpur University) ६१.९९
०६ हैदराबाद विद्यापीठ (Hyderabad University) ६१.७०
०७ कोलकाता विद्यापीठ (Calcutta University) ६१.५३
०८ मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एजुकेशन, मणिपाल (Manipal Academy of Higher Education) ६१.५१
०९ सावित्रिबाई फूले पुणे विद्यापीठ, पुणे (Savitribai Phule Pune University) ६१.१३
१० जामिया मिल्लिया इस्लामिया, नई दिल्ली (Jamia Millia Islamia) ६१.०७
मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानी देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत विद्यापीठ ६५व्या स्थानावर पोहोचले आहे. तर महाराष्ट्रातील पारंपरिक राज्य विद्यापीठांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सुधारली आहे. मागील वर्षी मुंबई विद्यापीठ ८१व्या स्थानावर होते. पुणे विद्यापीठ अव्वल राज्यात अव्वल आले असून, सर्वसाधारण क्रमवारीत विद्यापीठाने १९वे स्थान मिळवले आहे. तर पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ नवव्या स्थानावर आहे. या विद्यापीठाने एकूण ५८.७७ गुण प्राप्त केले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37pw34O
via IFTTT

Post a Comment

0 Comments