Top Engineering Colleges in India 2020: देशातील टॉप १० इंजिनिअरिंग कॉलेज

नवी दिल्ली: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज इंडिया रँकिंग २०२० जाहीर केले. एनआयआरएफचे म्हणजे राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी थेट वेबसाइटद्वारे एनआयआरएफ इंडिया रँकिंग २०२० जाहीर केले. एनआयआरएफ इंडिया रँकिंग पाच निकषांवर आधारित आहे. ते पाच मापदंड म्हणजे अध्यापन, शिक्षण आणि साधने, संशोधन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस, पदवीधर आणि सर्वसमावेशकता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास यावर्षी एकूण ८९.९३ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. त्यानंतर, आयआयटी दिल्ली ८८.०८ च्या गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ८५.०८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढे सर्व 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी पाहू शकता.
रँक संस्थेचे नाव स्कोअर
भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास ८९.९३
भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली ८८.०८
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ८५.०८
भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर ८२.१८
भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर ८०.५६
भारतीय तंत्रज्ञान संस्था रुरकी ७६.२९
7 भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी ७४.९०
8 भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद ६६.४४
9 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था तिरुचिराप्पल्ली ६४.१०
10 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदूर ६२.८८
देशातील टॉप १०० इंजिनीअरिंग महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी गतवर्षीही आयआयटी मद्रासने ८९.०५ स्कोरसह अव्वल स्थान मिळविले. मागील वर्षी आयआयटी दिल्ली ८५.३६ स्कोरसह दुसऱ्या स्थानी होती. आयआयटी मुंबईचे स्थान ८४.४० गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर तर आयआयटी खडगपूर ७९.४१ स्कोरसह गुणांसह चौथ्या क्रमांकावर आणि आयआयटी कानपूर ७७.५७ स्कोरसह सह पाचव्या क्रमांकावर आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37iFWRR
via IFTTT

Post a Comment

0 Comments