देशातील ५६६ विद्यापीठांमध्ये पदवीच्या अंतिम सत्र परीक्षा

नवी दिल्ली: देशभरातील एकूण ७५५ विद्यापीठांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतच्या त्या त्या विद्यापीठांतील स्थितीबाबतची माहिती कळवली आहे. यूजीसीने ६ जुलै रोजी देशातील सर्व विद्यापीठांना परीक्षांचे आयोजन करण्यासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्या ७५५ विद्यापीठांनी यूजीसीला आपल्या विद्यापीठातील परीक्षांसंदर्भातील माहिती कळवली आहे, त्यापैकी ३२१ राज्यातील विद्यापीठे, २७४ खासगी, १२० स्वायत्त आणि ४० केंद्रीय विद्यापीठे आहेत. यापैकी एकूण ५६६ विद्यापीठांनी त्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा एकतर यापूर्वीच घेतल्या आहेत, किंवा ती विद्यापीठे अंतिम सत्र परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आयोजित करणार आहेत. एकूण ५६० विद्यापीठांपैकी १९४ विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत आणि ३६६ विद्यापीठांची ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये परीक्षेचे नियोजन करण्याची योजना आहे. यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यापीठांनी परीक्षांबद्दलची माहिती कळवली आहे त्यापैकी २७ खासगी विद्यापीठे आहेत. त्यापैकी काही विद्यापीठांनी यूजीसीला कळवले आहे की त्यांची पहिली बॅच अद्याप परीक्षेसाठी पात्र नाही. कोविड - १९ विषाणूच्या संसर्गामुळे सर्व शैक्षणिक संस्था गेले चार महिन्यांपासून बंद आहेत. शनिवारपर्यंत देशभरात करोना संक्रमितांची संख्या १०, ३८,७१६ झाली आहे. गेल्या २४ तासात ३४,८८४ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर ६७१ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६,५३,७५१ रुग्ण बरे झाले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hepdTu
via IFTTT

Post a Comment

0 Comments