Also visit www.atgnews.com
कोविड -१९ मध्ये परीक्षा शक्यच नाही; शिक्षणमंत्री ठाम
Final Year 2020: यूजीसीने जी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत, त्यानुसार राज्य सरकारला परीक्षा घेणं शक्य नाही, यावर आपत्कालीन विभागाच्या बैठकीतही शिक्कामोर्तब झालं. आप्तकालीन विभागाची बैठक सोमवारी १३ जुलै रोजी मंत्रालयात पार पडली. त्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राज्यातील पदवी परीक्षांबाबत जो आधीचा निर्णय होता, तोच आपत्कालीन विभागाच्या बैठकीतही कायम ठेवण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले. यासंदर्भात पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली तर ती घेऊ, असंही सामंत म्हणाले. राज्यात आज १२१५० कन्टेन्मेंट झोन आहेत. सुमारे १ कोटी जनता कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकली आहे. तेथील विद्यार्थी परीक्षा कसे देणार हे विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगावे. त्यांनी SOP जाहीर केली तरी त्यानुसार येथे परीक्षा घेणे अशक्य आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे १०२८९ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत दोन लाखांवर कोविड - १९ संक्रमित आहेत. ही आकडेवरी पाहून तरी किमान यूजीसीने सारासार विचार करून निर्णय घ्यावा, असं आवाहन सामंत यांनी केलं. परीक्षाच घ्यायचीच नाही असं कधीही म्हटलेलं नाही ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारची संधी देण्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा रद्दच करण्यात आली असा गैरसमज पसरवला जाऊ नये, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांना संधी दिली जाणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल तर तशीही तयारी विद्यापीठे करतील. मात्र सध्या राज्यात कोविड विषाणूचा जो कहर सुरू आहे, त्या परिस्थितीत परीक्षा घेतल्या जाऊ शकणार नाहीत, हे सामंत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. वाइन शॉप आणि विद्यापीठांची तुलना नको बंगळुरूमध्ये ५० विद्यार्थ्यांची परीक्षा झाली, त्यापैकी अनेकांना कोविड - १९ ची बाधा झाली, हे सामंत यांनी लक्षात आणून दिले. तसेच यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांना सामंत यांनी टोला लगावला. पटवर्धन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींचा उल्लेख सामंत यांनी केला. पटवर्धन यांच्या मुलाखती मी वाचल्या. यूजीसी मार्गदर्शत तत्वे विद्यापीठांना बंधनकारकच आहेत, हे ते पटवून देत आहेत. पटवर्धन हे महाराष्ट्रातले आहेत. त्यांनी यूजीसीची भूमिका मांडण्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती यूजीसीला समजावून सांगावी, असं आवाहन उदय सामंत यांनी केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gOLC9u
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments