सीबीएसईची वेबसाइट क्रॅश; विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडचणी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी १३ जुलै रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. पण निकालाची घोषणा होताच सीबीएसईची अधिकृत वेबसाइट क्रॅश झाली. मोट्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने वेबसाइटवर ताण आला आणि ती ढेपाळली. विद्यार्थ्यांना यामुळे निकाल पाहण्यासाठी मोठा अडसर आला. सोशल मीडियावरदेखील अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.७८ टक्के आहे. एकूण १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ११ लाख ९२ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, बारावीच्या ४०० विद्यार्थ्यांचे निकाल संगणकीकृत पद्धतीने आणि ठरलेल्या सूत्रानुसार जाहीर करता आलेले नाहीत. हे निकाल नंतर घोषित केले जातील, असं बोर्डाने जाहीर केलं आहे. निकाल एका दृष्टीक्षेपात परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या - १२,०३,५९५ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या - ११,९२,९६१ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या - १०.५९,०८० निकालाची एकूण टक्केवारी - ६६.७८ एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ८६.१९ एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी - ९२.१५ हेही वाचा: या वर्षी 'असा' तयार झाला निकाल ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होईल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी तीनहून अधिक पेपर दिले आहे, त्यांचा उर्वरित विषयांचे गुण हे त्यांनी दिलेल्या पेपरपैकी सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीएवढे असतील. ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत तीन पेपर दिले आहेत, त्यांना उर्वरित विषयांसाठी सर्वोत्तम दोन विषयांच्या सरासरीएवढे गुण मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे, त्यांचा निकाल बोर्डातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण आदींच्या आधारे लावला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OjVNqz
via IFTTT

Post a Comment

0 Comments