Also visit www.atgnews.com
निसर्ग चक्रीवादळग्रस्त १५ महाविद्यालयांना विद्यापीठाची ५६ लाखांची मदत
मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांसाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यापीठाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून या महाविद्यालयांना रुपये ५६ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत ठराव करण्यात आला आहे. ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागातील मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील काही महाविद्यालयांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या महाविद्यालयांना मदत करण्यासाठी व झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विद्यापीठामार्फत भेट देऊन अहवाल तयार करण्यात आला. त्याअनुषंगाने महाविद्यालयांच्या नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या निर्देशानुसार प्र.कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. सुधीर पुराणिक आणि कोकण विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी महाविद्यालयांना दिलेल्या प्रत्यक्ष भेटीतून व रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी एकत्रित केलेल्या माहितीवरून महाविद्यालयांचे इमारतीचे पत्रे, इलेक्ट्रीक वायरिंग, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन समितीने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील सुमारे १५ महाविद्यालयांना ५६ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत रोखीने न देता संबंधित महाविद्यालयांनी पत्रे, इलेक्ट्रीकल्स साहित्य, शैक्षणिक साहित्य, विकत घेऊन बिले सनदी लेखापालाकडून प्रमाणित करून विद्यापीठाकडे पाठवून परतावा दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठातर्फे मदत जाहीर केलेल्या महाविद्यालयांची नावे आणि मदत केलेली रक्कम लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, मंडणगड-७ लाख रुपये, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवे मॉडेल कॉलेज-७ लाख, टिकमभाई मेहता वाणिज्य महाविद्यालय माणगाव-७ लाख, दोशी वकील कला, गोरेगाव कॉ-ऑपरेटिव्ह अर्बन बँक विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गोरेगाव-७ लाख, एन. के. वराडकर कला व आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय, दापोली-४ लाख, दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय दापोली- ४ लाख, माणगाव शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, विज्ञान महाविद्यालय, माणगाव- ४ लाख, जी.बी. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पी.जी. ढेरे कला व एम. जी. भोसले विज्ञान महाविद्यालय, गुहागर-२ लाख, गोखले शिक्षण संस्थेचे कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन- २ लाख, वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसळा, रायगड- २ लाख, द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा, रायगड- २ लाख, जी.एम. वेदक विज्ञान महाविद्यालय तळा- २ लाख, डॉ.सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय, सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय,रोहा- २ लाख, शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालय पाली – २ लाख, अंजूमन इस्लाम वाणिज्य महाविद्यालय, श्रीवर्धन- २ लाख
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZWuadK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments