IBPS RRB ग्रामीण बँकांमध्ये पीओ, क्लर्क पदांवर बंपर भरती

IBPS RRB Notification 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात IBPS ने ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती सुरू केली आहे. स्केल १,२ आणि ३ चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२० आहे. या भरतीद्वारे पीओ आणि क्लर्कच्या हजारो पदांवर भरती केली जाणार आहे. ही सर्व मिळून एकूण ९ हजारांहून अधिक पदे आहेत. आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट २०२० मध्ये ४३ वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणर आहे. यामध्ये स्केल १,२ आणि ३ चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीनुसार यामध्ये यूपी ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक, हरियाणा ग्रामीण बँक, राजस्थान मुरुधारा ग्रामीण बँक, मध्यांचल ग्रामीण बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक, झारखंड राज्य ग्रामीण बँक, बडोदा यूपी बँक, आर्यवर्त बँक लखनऊ, दक्षिण बिहार ग्रामीण बँक, पटना बिहार, बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि छत्तीसगड राज्य ग्रामीण बँकेसह अन्य राज्यांच्या बँकांचा समावेश आहे. पगार किती? ऑफिस असिस्टंटला ७२०० रुपये ते १९३०० रुपये पगार असणार आहे. तर ऑफिसर स्केल - III (सीनियर मॅनेजर )- २५७०० रुपये ते ३१५०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे. ऑफिसर स्केल - II (मॅनेजर)- १९४०० रुपये ते २८१०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे. ऑफिसर स्केल - I (असिस्ंटट मॅनेजर) - १४५०० रुपये ते २५७०० रुपये प्रति महिना पगार असणार आहे. अशी होणार निवड सहाय्यक अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा होईल. पदाच्या निवडीची अंतिम गुणवत्ता यादी मुख्य परीक्षेच्या आधारे तयार होईल. ऑफिस स्केल १ मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जाईल, त्याआधारे फायनल मेरिट लिस्ट तयार होईल. ऑफिस स्केल २ आणि ३ साठी सिंगल पातळीवरील परीक्षा होईल. या परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलाखतीला बोलावले जाईल आणि अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VFiNnX
via IFTTT

Post a Comment

0 Comments