SSC CGL Tier-I परीक्षेचा निकाल जाहीर

CGL Tier-I Result: स्टाफ सिलेक्शन कमिशनने सीजीएल (कम्बाइन्ड ग्रॅच्युएट लेवल) टियर १ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर हा निकाल पाहता येणार आहे. उमेदवार या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल जाणून घेऊ शकतात. सीजीएल टियर १ परीक्षेत ८,९५१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. सीजीएल टियर १ परीक्षेचं आयोजन ३ मार्च २०२० ते ९ मार्च २०२० या कालावधीत करण्यात आले होते. एकूण ९ लाख ७८ हजार १०३ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. टियर १ परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना टीयर २ आणि टियर ३ परीक्षा देण्यासाठी शॉर्टलिस्ट केले गेले आहे. सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि सांख्यिकीय अन्वेषक, ग्रेड २ आणि अन्य सर्व पदांसाठी वेगवेगळी कट ऑफ ठरवण्यात आली आहे. - आता एक पीडीएफ उघडेल, तेथे आपला रोल नंबर सर्च करा. - जर तुमचा रोल नंबर या यादीत असला की समजावे तुम्ही उत्तीर्ण झाला आहात. टीयर १ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर २ परीक्षा द्यावी लागते. CGL टिअर २ परीक्षा १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हेही वाचा: पात्र / अपात्र उमेदवारांचे गुण, अंतिम उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका ७ जुलै २०२० रोजी संकेतस्थाळवर प्रसिद्ध होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YRY4zb
via IFTTT

Post a Comment

0 Comments