पहिली ते पाचवीसाठी NCERT चं नवं कॅलेंडर

Class 1-5 part-2: नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी वैकल्पिक अकॅडमिक कॅलेंडरचा दुसरा भाग जारी केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. निशंक यांनी गुरुवारी २ जुलै रोजी या कॅलेंडरचं प्रकाशन केलं. एनसीईआरटीने सर्व प्रकारच्या शाळांमधील पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक वर्गांना डोळ्यांसमोर ठेवून या कॅलेंडरची निर्मिती केली आहे. घरातूनच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच शिक्षक आणि पालकांनाही हे कॅलेंडर खूपच उपयोगी पडणार आहे. एनसीईआरटीने दोन महिन्यांपूर्वी या कॅलेंडरचा पहिला भाग जारी केला होता. आता दुसरा भाग आला आहे. हे कॅलेंडर डाऊनलोड करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे. डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत लिहिले आहे की, 'या कॅलेंडरमध्ये शिक्षक आणि पालकांसाठी मुलांना इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवण्यासंबंधी जरुरी दिशानिर्देश आहेत. हे कॅलेंडर विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या आणि दिव्यांग मुलांच्या गरजांनुसारदेखील तयार केले गेले आहे. यात ऑडिओबुक्स, रेडिओ प्रोग्राम्स, व्हिडिओ प्रोग्राम्सच्या लिंकदेखील आहेत.' केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत अल्टरनेटिव्ह हे गरजेचे आहे. तणावपूर्ण अशा सद्यस्थितीत आपल्याला मुलांना केवळ व्यग्र ठेवायचे नाही तर नव्या इयत्तेतले त्यांचे शिक्षणही निरंतर सुरू ठेवायचे आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी NCERT द्वारे अल्टरनेटिव्ह अकॅडमिक कॅलेंडर पार्ट - २ डाऊनलोड करण्यासाठी NCERT च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3grPTPZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments