Also visit www.atgnews.com
विद्यापीठ परीक्षांसाठी UGC चे SOP जारी
घ्या असे सांगणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या () मार्गदर्शक तत्वांवरून सुरू असलेला वाद ताजा असतानाच आता यूजीसीने परीक्षा कशा आयोजित केल्या जाव्यात यासाठीच स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी केले आहे. या SOP मध्ये परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी काही नियम असे - - दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान २ मीटरचे अंतर असावे. - दोन विद्यार्थ्यांमधील एक आसन रिकामे ठेवावे - एका वर्गात चार रांगा (बेंचच्या) असतील आणि त्यामध्ये एका सीटची जागा मोकळी असेल. विद्यापीठ अनुदान आयोगाने सोमवारी ६ जुलै रोजी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यानुसार, विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. या परीक्षा सप्टेंबर महिन्या अखेर घ्याव्यात, असेही सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात कोविड - १९ च्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पदवी परीक्षा रद्द केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यापूर्वीच जाहीर केले आहे. राज्यात परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत वारंवार सांगत आहेत. परीक्षा घ्यायच्याच झाल्या तर यूजीसीने SOP जाहीर करावी, असं उदय सामंत यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितल्यानंतर काही तासांतच यूजीसीची एसओपी जाहीर झाली. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे लाखो विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. गुरुवारी दुपारी सामंत यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iJh6Qj
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments