जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; नोंदणी ११ सप्टेंबरपासून

JEE Advanced 2020 : परीक्षेची माहिती पुस्तिका (ब्रोशर) अद्ययावत करण्यात आले आहे. यात सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयआयटी दिल्ली यंदा या परीक्षेचे आयोजन करणार आहे. जेईई अॅडव्हान्स्डसाठी ११ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी सुरू होणार आहे. विद्यार्थी सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in ला भेट देऊ शकतात. ११ सप्टेंबरपासून सुरू होणारी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया १६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थी शुल्क भरण्याची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत करू शकतात. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. परीक्षेचा निकाल ५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. जेईई मेन परीक्षेतील टॉप २.५ लाख विद्यार्थीच जेईई अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे आणि या परीक्षेचा निकार १० सप्टेंबर रोजी आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देशातील सर्व आयआयटींमधील इंजिनीअरिंग, सायन्य किंवा आर्किटेक्चरच्या पदवी, इंटिग्रेटेड मास्टर्स किंवा बॅचलर-मास्टर ड्युअल डिग्री अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते. जेईई अॅडव्हान्स्डचा पेपर पॅटर्न परीक्षेला दोन पेपर (पेपर १ आणि पेपर २) असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी तीन तासांचा असतो. दोन्ही पेपर्स देणे बंधनकारक आहे. प्रत्येक पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सचे तीन स्वतंत्र विभाग असतात. काही प्रश्नांच्या उत्तरांना नकारात्मक मूल्यांकन असते. परीक्षा पुढील वेळांनुसार होईल - परीक्षेची तारीख - रविवार, २७ सप्टेंबर २०२० पेपर १ ची वेळ - सकाळी ९ ते दुपारी १२ पेपर २ ची वेळ - दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० जेईई अॅडव्हान्स्ड अॅडमिट कार्ड जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी हॉल तिकीट सोमवार २१ सप्टेंबर २०२० पासून परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर उपलब्ध होईल. विद्यार्थी २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत हे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील. अॅडमिट कार्डवर विद्यार्थ्याचे नाव, जेईई अॅडव्हान्स्डचा रोल नंबर, छायाचित्र, स्वाक्षरी, जन्मतारीख, पत्ता आदी माहिती असेल. याशिवाय परीक्षा केंद्राचा पत्त आणि नाव असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gwKZRo
via IFTTT

Post a Comment

0 Comments