Also visit www.atgnews.com
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर
कोविड-१९ परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० ही २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा यापूर्वीही एकदा नव्हे तर दोन वेळा लांबणीवर पडली होती. ही परीक्षा आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वात आधी ही परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार सर्वात आधी ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले. तसे परिपत्रक १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबरलाच नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली. त्यामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर ऐवजी रविवार २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोविड-१९ स्थितीमुळे केवळ पूर्व परीक्षाच नव्हे तर या दरम्यानच्या काळातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षेव्यतिरिक्त महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही ११ ऑक्टोबर रोजी होणार होती. तीही लांबणीवर पडली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YByxd2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments