Also visit www.atgnews.com
NEET UG 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने () नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्टचे (NEET) अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थी ntaneet.nic.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतात. परीक्षा केंद्रावर वैध अॅडमिट कार्डशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कोणत्या वेळी हजर व्हायचे आहे, त्याची वेळ अॅडमिट कार्डवर दिली आहे. त्या वेळेचे काटेकोर पालन करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरच्या सर्व सूचना परीक्षेला जाण्यापूर्वी नीट वाचायच्या आहेत. नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. यापूर्वी ती २६ जुलै रोजी होणार होती, मात्र कोविड-१९ संसर्ग स्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, सोमवारपर्यंत ७ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन (JEE Main) चे अॅडमिट कार्ड डाऊनलोड केले होते. जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत होणार आहे. ३२० विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे. एनटीएचे संचालक विनीत जोशी म्हणाले, '२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ८५ टक्के विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड केले आहेत. यापैकी ३२० विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे. नीट यूजी २०२० चे अॅडमीट कार्डही लवकरच जारी केले जाणार आहेत. ९९ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमाचे पहिले शहरच परीक्षेसाठी केंद्र म्हणून दिले जाईल याची एनटीए हमी देत आहे.' नीटसाठी ३,८४२ परीक्षा केंद्रे नीट यूजीसाठी मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थी संख्या ५९७ वरून ४१६ करण्यात आली आहे. नीटसाठी यंदा ३,८४२ परीक्षा केंद्रे आहेत. मागील वर्षी ही संख्या २,५४६ होती. जेईई मेन परीक्षेसाठी एकूण ६६० केंद्रे आहेत. यात आधीच्या तुलनेत ९० केंद्रांची वाढ झाली आहे. जेईई मेनच्या जानेवारी परीक्षेच्या वेळे एका केंद्रावर १,८७१ विद्यार्थी होते. आता ही संख्या १,४४५ पर्यंत कमी करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2CXijmW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments