Also visit www.atgnews.com
दिल्लीत ५ ऑक्टोबरपर्यंत शाळा राहणार बंद
करोना व्हायरसचा कहर कमी होताना दिसत नसल्याने सरकारने सर्व शाळा ५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील अशी घोणषा केली आहे. या दरम्यान ऑनलाइन वर्ग सुरू असतील. दिल्ली सरकारने शुक्रवारी यांदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. करोना व्हायरसचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे दिल्लीसह अनेक राज्यांची सरकारे शाळा सुरू करण्यास अद्याप धजावताना दिसत नाहीत. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा सारखी राज्ये शाळा उघडत आहे. मात्र हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय अद्याप शाळा उघडण्याच्या तयारीत नाहीत. या यादीत आता दिल्लीचाही समावेश झाला आहे. शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी निर्देश दिल्ली सरकारच्या परिपत्रकानुसार, आवश्यकतेनुसार जुन्या मार्गदर्शक तत्वांनुसार शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावले जाऊ शकते. सरकारी, अनुदानित, खासगी आणि एमसीडीसह दिल्लीच्या सर्व शाळांना निर्देश देण्यात आले आहेत की या सर्क्युलरबद्दल कर्मचारी, पालक-विद्यार्थ्यांना फोन, एसएमएसद्वारे किंवा अन्य माध्यमातून माहिती द्या. दिल्ली सरकारने केला होता सर्व्हे दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाने शाळा उघडण्यासंदर्भात पालकांचे मत जाणून घ्यायला एक सर्व्हेक्षण केले होते. एका गुगल फॉर्मद्वारे पालकांना शाळा उघडण्याविषयी विचारणा करण्यात आली. बहुतांश पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला. ६५ टक्के पालकांना नकार होता, १५ टक्के पालक अनिश्चित होते आणि केवळ १५ टक्के पालक सहमत होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iIdaPp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments