Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठातील सर्व विभाग तसेच दूर व मुक्त अध्ययन संस्था अर्थात 'आयडॉल'च्या परीक्षा घेण्यासाठी एक अॅप विकसित करण्यात आले आहे. हे अॅप डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाइलवरही काम करते. मात्र यासाठी असलेल्या तांत्रिक अटींची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यापीठातील सर्व विभाग आणि आयडॉलची परीक्षा घेण्यासाठी चेन्नईस्थित कंपनीकडून अॅप विकसित करून घेतले आहे. या अॅपवर सध्या सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सोमवारी आणि मंगळवारी बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जाणार आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्याची ओळख पटवली जाणार आहे. तसेच हे अॅप कसे वापरावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. हे अॅप डेस्कटॉपवर वापरण्यासाठी विद्यार्थ्याकडे विंडोज ८.१ किंवा त्यापुढील व्हर्जन असलेली ऑपरेटिंग सिस्टिम असणे बंधनकारक आहे. मोबाइलवर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचे ५.१ किंवा त्या पुढचे व्हर्जन असणे आवश्यक आहे. याचबरोबर कम्प्युटर तसेच मोबाइलमध्ये चार जीबी रॅम असावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. तसेच किमान दोन जीबी जागा मोकळी असावी म्हणजे हे अॅप व्यवस्थित काम करू शकते असे प्रशिक्षणात सांगण्यात आले. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे साधे स्मार्टफोन असून त्यात दोन जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोअरेज क्षमता आहे. यामुळे असे मोबाइल कोठून आणायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कम्प्युटरवरून परीक्षा द्यायची असेल तर बहुतांश विद्यार्थ्यांकडे जुने कम्प्युटर असून त्यांच्याकडे विंडोज ७ हे व्हर्जन आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ काय करणार असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. दरम्यान, परीक्षा सुलभ व्हाव्यात या उद्देशाने हे अॅप विकसित करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वेबिनार्सचे आयोजन करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mPWIPq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments